Thursday, October 15, 2020

स्वाक्षरी विश्लेषण

स्वाक्षरी तुमची ओळख असते. पहिले साक्षरता कमी असल्याने सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांवर अंगठा उमटवला जायचा. जसा काळ बदलत गेला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आणि आता अगदी लहान लहान गावामधील सर्वच आपली  स्वाक्षरी करायला लागले आहेत. आपली स्वाक्षरी ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आताचा काळ डिजिटल स्वाक्षरीचा असला तरी  प्रत्यक्ष सहीचे महत्त्वही तितकेच अबाधित आहे. एखाद्याच्या सहीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, सवयी कळतात, त्याच्या वागणुकीचा अंदाज येऊ शकतो असे सांगितले जाते. आज आपण जाणून घेऊ आपल्या जीवनाचा आणि स्वाक्षरीचा नेमका काय संबंध आहे?

सही किंवा स्वाक्षरी ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. अगदी शालेय जीवनापासून सही वा स्वाक्षरी करण्याची सुरुवात होते. महाविद्यालय, उच्च शिक्षण, पदवी परीक्षा, नोकरी, जबाबदारी आणि अशा कितीतरी ठिकाणी आपण स्वाक्षरी करत असतो. लहान असताना अनेक जण जुजबी सही करत असतात. मोठे झाल्यावर आणि बऱ्यापैकी समज आल्यावर बहुतांश जण त्यात बदल करतात आणि सहीचा तो पॅटर्न जवळपास कायम ठेवतात. एखादा फॉर्म भरण्यापासून ते बँकेच्या धनादेशापर्यंत कितीतरी दस्तऐवजांवर आपण सह्या करत असतो. सही, स्वाक्षरी, सिग्नेचर म्हणजे नेमके काय? साधा सोप्पा अर्थ  म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वत:चे लिहिलेले नाव. थोडक्यात सही म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख असते.म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, या उक्तीनुसार, प्रत्येकाच्या स्वाक्षरीची पद्धत, प्रकार अगदी निरनिराळे असतात. एकच नाव असलेली जगभरात अनेक माणसे असू शकतात. मात्र, त्यांची स्वाक्षरी ही वेगळीच असते. प्रत्येक स्वाक्षरी 

 एखाद्याच्या सहीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, सवयी कळतात, असे सांगितले जाते. 

​कुशल आणि प्रतिभावंत सेलिब्रिटी, कलाकार, साहित्यिक यांच्या स्वाक्षऱ्या मिळवण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडत असते. ज्या व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढतात, त्या व्यक्ती विलक्षण प्रतिभावंत असतात. हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात, असे सांगितले जाते. ज्या व्यक्ती कलात्मक आणि आकर्षक सही करतात, ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात, असे सांगितले जाते.अनेक कलाकार यांनी वेगवेगळ्या टप्प्या मध्ये आपल्या स्वाक्षरी मध्ये बदल केलेला आहे. असे का केले असावे ? नक्कीच त्याला अर्थ आहे. हा अर्थ दडलेला आहे तुमच्या शब्दांच्या वळणावर . 

एकाच नावाचे कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचे स्वभाव , त्यांचे व्यक्तिमत्त्व , प्रतिभा या सगळ्यांमध्ये फरक असतो. काहीच्या भल्यामोठ्या पण रेखीव स्वाक्षरी पाहता क्षणीच आपल्याला त्या व्यक्तीविषयी भारदस्तपणा वाटायला लागतो. आपण आपली स्वाक्षरी लहानपणापासून करत असतो पण नकळतपणे त्यामध्ये लहान लहान बदल झालेले असतात. तुमची आधीचीस्वाक्षरी ही तुमच्या आताच्या स्वाक्षरी ही जास्त परिपक्व वाटायला लागते. हे बदल म्हणजे नक्की काय ? आणि आपल्या सबकोशन्स माईंड मध्ये कसे रुजवावे जेणे करून ते शब्दांच्या वळणावर उमटायला लागतात.

या विषयी सविस्तरपणे आपण पुढच्या लेखात इतयंभूत समजून घेऊ या.


स्वाक्षरी विश्लेषक

पंकज बाविस्कर : 9833274447


5 comments:

  1. खूप छान. आम्ही वाट बघतोय पुढच्या लेखाची

    ReplyDelete
  2. झकास,छान माहिती

    ReplyDelete
  3. ho पुढचा लेख कधी येईल

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती मिळाली.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  5. इंटरेस्टिंग

    ReplyDelete

Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar

Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...