Sunday, November 22, 2020

आपली स्वाक्षरी बदला आपलं जीवन बदलेल



तुमचं सबकॉन्शनस माईंडचे तुमच्या स्वाक्षरीशी थेट संबंध असतो.तुमची स्वाक्षरी ही तुमच्या व्यक्तित्वचे प्रतिबिंब असते.तूमच्या सिग्नेचर द्वारे तुमचा स्वभाव, तुमची वागणूक, आर्थिक विचार, इमोशन्स, सामाजिक जीवन, व्यावहारिक जीवन, भविष्या विषयी असलेले तुमचे विचार अशा एक ना अनेक गोष्टी स्वाक्षरीच्या माध्यमातून समजतं असतात. तुमची स्वाक्षरी कशी असावी आणि कशी नसावी यावर आपण हळुहळू प्रकाश टाकणार आहोत.
आपण समजून घेऊया की स्वाक्षरी कशी असावी आणि त्यामुळे होणारे फायदे. या लेखात आपण ती प्रकार बघणार आहोत त्यानंतर पुढील लेखात आपण अधिक प्रकार समजून घेऊ या... बघा तुमची सिग्नेचर काय सांगते ?

स्वाक्षरीचे अनेक प्रकार आहेत. आपण काही मोजके ठळक प्रकार बघू या...


काही सिग्नेचर वाईल्ड म्हणजे मोठ्या असतात. अशा सिग्नेचर मधली अक्षर विस्तारलेली असतात. अगदी पटकन वाचता येतात कारण शब्द मोठी असतात.त्यांची स्वाक्षरीची एक अदब असते. त्यांचे विचार त्यांच्या सही सारखे मोठे आणि विस्तारलेले असतात.नेहमी पुढे कसे जाता येईल याचाच विचार ते करत असतात.महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व असून मोठं घर , मोठी गाडी , मोठं ऑफिस , नोकरी करत असेल तर बढती हवी असते. असे मोठे विचार असतात. आणि फक्त विचार नाही तर अफाट मेहनत घेतात , जिद्दीने पुढे जातात.अशी लोक सगळयांनशी मिळून मिसळून वागतात.त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. ते सोशल असतात. त्यांना त्यांचं नेटवर्क वाढवायला आवडतं.बोलके असल्याने आणि किंबहुना स्वतःच्या कामावर , स्वतःवर कमालीचा विश्वास असल्याने ते नेहमी आत्मविश्वासाने अनेकांना भेटतात आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करतात. त्यांचं राहणीमान ते उच्च ठेवतात अगदी आवर्जून लक्ष देतात. स्वतःच्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देताना दिसून येते. व्यवहारात ते फार जास्त डिटेलिग करत नाहीत. मोठे व्यवहार पाहणे आणि ते डील करून घेणं याकडे जास्त लक्ष असतं.यांचे विचार शार्प असतात उगाच लहानलहान गोष्टीत अडकत नाहीत. आणि सर्वात महत्वाचे त्यांची निर्णयक्षमाता उत्तम असते.आणि एखादा निर्णय चुकला आणि नुकसान झालं तरी ते निभावून घेऊन जातात. नुकसानातून पटकन बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात करतात. उगाच बाऊ करत बसत नाहीत. अशी मंडळी मार्केटिंग , राजकारण , ह्यूमन रिसोर्स , व्यवसाय या क्षेत्रात प्रगती करतात.यांना प्रवास करायला आवडतो. पैसे खर्च करतानाही ते मोकळेपणाने पैसे खर्च करतात. हे वर्णन झाले मोठया सिग्नेचरबाबत...पण तुम्हांला उत्सुकता असेलच की लहान सिग्नेचर करणाऱ्यांचे स्वभाव , सवयी कशा असतील ??






आपण पुढे पाहणार आहोत लहान सिग्नेचर बाबतचे विश्लेषण...
लहान सिग्नेचर करणारी लोक ही सिमीत विचारांचे असतात.आहे त्या मध्ये ते समाधानी असतात. त्यांचे मित्रपरिवार देखील मोजके असतात पण नक्कीच ते विचार करून निवडतात म्हणून मित्रपरिवार चांगला असतो. आणि फॅमिलीला जास्त वेळ देतात त्यांना अधिक महत्व देतात. प्रत्येक गोष्टीत डिटेलिंग करतात. प्रत्येक गोष्ट चाचपडून पाहणे , सतत त्यावर विचार करणे माहिती काढणे मग च ती गोष्ट ते मान्य करतात.अशी लोक संशोधक होऊ शकतात. ही मंडळी रिस्क घेयला घाबरतात खूप कमी वेळा एखाद्या गोष्टीची रिस्क घेतात. फायनान्स रिस्क तर टाळतात. हिशेब व्यवस्थित ठेवतात. Acountat ,टेजरर , फायनास , संशोधक , मिडिकल , प्रोजेक्ट mangemant या क्षेत्रात जास्त यश प्राप्त करतात.




अजून एक सिग्नेचर आहे ती म्हणजे पॉइंटेड सिग्नेचर हा प्रकार काय आहे समजून घेऊ या...
यामधील अक्षर ही टोकदार असतात. ही मंडळी कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यानां एखादी गोष्ट त्यांच्या बुद्धीला पटत नाही. तो पर्यंत ते विश्वास ठेवत नाही त्यांना लॉजीकली ते पटलं तरचं ते त्यावर विश्वास ठेवतात.यांच्या सिग्नेचर प्रमाणे यांची वाणी देखील कडक आणि टोचणारी असते.ते नेहमी खरे आणि स्पष्ट बोलतात. कधीतरी त्यांच्या अशा बोलण्याने लोक दुखावतात पण ते नेहमी स्टेट फॉरवर्ड राहणं पसंद करतात.पेहराव तसेच स्टायलिश राहण्यापेक्षा ते साधराहाणीमान ठेवतात पण ते बुद्धीला मात्र जास्त प्राधान्य देतात. ते त्यांचं मुख्य शस्त्र असतं.यांची अध्यात्मिक प्रगती उत्तम होते. 

स्वाक्षरी चे असे ठराविक नमुने आपण पाहणार आहोत. आजच्या लेखात आपण तीन नमुने पाहिले आता पुढील लेखात अजून काही विश्लेषण पाहूया...



स्वाक्षरी विश्लेषक
पंकज बाविस्कर : 9833274447

1 comment:

  1. ह्या लेखामुळे सही किती महत्वाची असते हे कळलं.

    ReplyDelete

Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar

Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...