Wednesday, December 9, 2020

भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सही मधले बदल

आज आपण आज आपण भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सहीबद्दल जाणून घेऊया. एका सही मध्ये केलेल्या बदलाने सचिन तेंडूलकरच्या आयुष्यात, क्रिकेट कारकिर्दीत कशाप्रकारे फायदा झाला. आता आपण बघूया सचिन तेंडुलकरची सर्वात पहिली सही.
तर हि आहे तेंडूलकर यांची पहिली सही. त्यावेळी साधारण १५-१६ वर्षाचे वय असलेल्या सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सुरुवात झालेली होती. क्रिकेट मैदानावर कामगिरीचा आलेख चढता होता. तेव्हाचा एक किस्सा सांगतो. त्यावेळचे सुनील गावस्कर हे महान फलंदाज होते. त्यांनी सचिनला मोलाचे मार्गदर्शन केले होते. क्रिकेटच्या प्रत्येक बाबतीत सर्वार्थाने सहकार्य सचिनला केले होते. या त्यांच्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानावेत म्हणून सचिन तेंडूलकर यांनी सुनील गावस्कर यांची भेट घ्यायची ठरवली सोबत एक thank you कार्ड सुद्धा घेतले सुनीलजींना द्यायला. सचिन ने ते कार्ड दिले. ते कार्ड बघितल्यावर तिथे खाली एका कंसात सध्यासरळ अक्षरात सचिन रमेश तेंडूलकर असे नाव लिहिलेले होते. ते पाहून सुनील गावस्कर सचिनला म्हणाले की, “सचिन हे बघ, आता तू आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला आहेस. तर आता तू यावर सही कर.” त्यावरती सचिनने लगेचच पेन घेतले व सही केली. तीच ती ही सही. गावस्करांनी ती सही बघितली आणि ते म्हणाले की, “सचिन तुला तुझी सही बदलावी लागेल.” हे त्यांनी का म्हंटले त्यावेळी त्याची मला माहिती नाही. परंतु जेव्हा स्वाक्षरी विश्लेषक या दृष्टीने मी ह्या सहीकडे बघताना सुनील गावस्करांनी सांगितलेली ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे असे जाणवले. सुनीलजींनी अतिशय मोलाचा सल्ला दिला. कारण जर हीच सही आज सचिनची असती बदलली नसती तर आज सचिन ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत तो पोचू शकला नसता. त्याची क्रिकेट कारकीर्द बहरता आली नसती. त्याच्या त्या सहीमध्ये बऱ्याच उणीवा होत्या. ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर याचा नकारात्मक परिणाम झाला असतं आणि सचिन आज या पदापर्यंत पोचला नसता.

चला तर मग बघूया कि या सहीमध्ये कोणत्या उणीवा आहेत.

१. पहिली गोष्ट म्हणजे हि सही वाचता न येण्यासारखी आहे. एक स्वाक्षरी विश्लेषक या नात्याने एखाद्याची सही हि वाचता येण्याजोगी असली पाहिजे. ते गरजेचे आहे.

२. दुसरी गोष्ट यात काही शब्द गाळलेले आहेत जसे कि आडनावाचे तेंडूलकर यातले काही शब्द वगळलेले आहे. जी माणसे वाचता न येण्यासारखी किंवा काही शब्द वगळलेली सही करतात ती उतावळी असतात. घाईघाईत निर्णय घेतात, नियोजन करत नाहीत. एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करत नाहीत. आता तुम्हीच बघा कि जर सचिन सारख्या व्यक्तीची हि सही आजही असती तर त्याचा फार मोठा नकारात्मक प्रभाव पडला असता. अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या.

३. अजून एक महत्वाची गोष्ट जी आधीच्या लेखात पण मी सांगितली होती. सही कशी असू नये यात एक गोष्ट सांगितली होती की, कधीही सही खालची आडवी रेष हि उलट्या बाजूने असता कामा नये. आणि नेमकी सचिनच्या सहीमध्ये उलट्या दिशेने आडवी रेघ दिसून येत आहे. उलट्या बाजूने केलेली आडवी रेघ हि कायम आपल्याला भूतकाळात नेते. आपण पुढे जाऊ शकत नाही. कितीही यश किंवा प्रसिद्धी मिळविली तरी आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही कारण आपण भूतकाळातील गोष्टींकडे आकर्षित होत असतो.


ह्या सगळ्या गोष्टी सचिनच्या आधीच्या सहीमध्ये होत्या. शेवटी सचिन हा सचिन आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतही त्याने सातत्याने येणाऱ्या बदलांचा, आव्हानांचा स्वीकार केला, प्रयत्न केला. त्याप्रमाणे त्याने लगेच आपली सही बदलली. ही आहे सचिनची बदल्लेई सही. हि सही इतरत्र उपलब्ध नाही कारण फार काळ हि सही केलेली नाही. जरी हि सही आधीपेक्षा चांगली असली, त्यातली अक्षरे स्पष्ट दिसत असली, नाव व आडनाव पूर्णपणे कोणताही शब्द न वगळता लिहिलेला असला तरी त्या सहीमध्ये एक आक्रमकता नाहीये जी सचिन सारख्या विश्वविजेत्या खेळाडूसाठी आवश्यक आहे. अश्या प्रकारची सही असणारी माणसे साधे सरळ असतात. त्यांचे विचार स्पष्ट असतात. आक्रमकता नसते. ते काय करणार आहेत ते समजते. ध्येयवादी नसतात. म्हणूनच हि सही फार काळ टिकली नाही.


आता हि आहे सचिनची पुढची सही. या पुढील बदलत्या सह्यांचा बेस म्हणजे ही सही आहे. यानंतर यातच थोडे थोडे बदल करून सचिनची सही बदलत गेली. या सहीमध्ये खूप चांगले सकारात्मक बदल केले गेले आहेत. यात सचिन पूर्ण नाव न लिहिता आद्याक्षर लिहिलेलं आहे. त्यातही सचिन मधला स हा वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. आडनाव लिहिताला तेंडूलकर मधला त हा वेगळ्या धाटणीचा आहे. त्या इंग्रजीतील टी अक्षराला कव्हर केलेलं आहे. आच्छादित केलेलं आहे. सही खाली आडवी रेष  देऊन खाली बिंदू दिलेला आहे.

याच सहीमध्ये थोडेसे बदल करून परत एक सुधारित सही केली. जी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हि सही सुद्धा बरच काळ होती. तर हि आहे ती सही. आता या सहीचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण करूया. यातील एस हे अक्षर नीटसे कळत नाही आहे. तो एस वर्तुळाकार आहे. अशी सही असणारी माणसे हि भावनिक असतात. त्यांना कोणी काही बोलले किवा तुलना केली तर भाऊक होतात. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर बदला घेण्यासाठी किंवा प्रत्युत्तर दाखल अशी माणसे आक्रमक असू शकतात. आडनावातील टी हा वर्तुळाकार एखाद्या आच्छादित आहे. जो एस अक्षराला आच्छादित केला आहे. आता इथून पुढे सचिनने स्वतःला वेगळ केलं आहे. त्यातील अक्षरे हि जशी आहेत तशी दिसत नाहीयेत. आपण जसं लिहू तशी ती दिसत नाहीत याचा अर्थ त्यांचे विचार खूप वेगळे आहेत. हटके आहेत. क्रिएटिव्ह असतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आपण अशा व्यक्तीना वाचू शकत नाही. त्यांचे विचार, नियोजन आपण ओळखू शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संपर्क करणे अवघड असते. इतर उर्वरित अक्षरांमध्ये प्रवाह चांगला आहे. एकमेकांशी जोडलेली अक्षरे आहेत पण तरीही तेंडूलकर मधील के हा इतरांपेक्षा मोठा आहे. जेव्हा एखाद अक्षर इतरांपेक्षा मोठं असेल तर अशी माणसे आपल्यापेक्षा लहान माणसांचा, इतरांचा विचार करत नाहीत. आपल्या बोलण्याने, वागण्याने, प्रतिक्रियेमुळे लोकं काय बोलतील, विचार करतील याचा त्यांना काही फरक पडत नाही. स्वतःच म्हणण खर करतात. अद्नावातील शेवटचे अक्षर आर हे पक्ष्याप्रमाणे आहे ज्यामुळे आशावाद निर्माण होतो. आणि असे सूचित करते कि माझे भविष्य खूप उज्वल असणार आहे. तसेच सही खाली केलेली आडवी रेष ही खूप शार्प आहे आणि शेवटी बाणासारखे केले आहे. ज्यातून ध्येयवादी असल्याची जाणीव होते. पटापट काम करण्यात महिर्र असतात अशी माणसे. त्याखालील डॉट त्यातून एक काहीतरी करून दाखवण्याचा जोश दिसून येतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे काही कराव लागेल त्यासाठी तयार असल्याचे सूचित करतो. एवढेच नव्हे तर जर अपयश आले तरी त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडतात. तर अशा प्रकारे सचिनची हि सही हि एक प्रकारे आक्रमक, आशावादी, ध्येयाकडे वाटचाल करणारी, विश्वासात्मक, जोशपूर्ण, आत्मविश्वासाने भरलेला, अपयशातून बाहेर पडणारा आणि तरीही स्वतःला आच्छादित केलेला. स्वतःबाबत खाजगी बाळगणारा. आपली स्पेस जपणारा अशी हि सही आहे सचिनची. जी त्याच्या नावाला, नावलौकिकाला तसेच त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला साजेशी आहे. यामुळे सचिनला यशप्राप्ती झाली आहे.
त्यापुढील सचिनची हि सही सुद्धा आधीचा बेस आहे. यातील जे काही ठरीव बदल आहेत ते जाणून घेऊया. टी चे कव्हर हे खूप मोठे आहे वर्तुळासारखे आहे. आधी त्यात सचिन मधल्या एस अक्षराबरोबर तेंडूलकर मधील इ अक्षराला सुद्धा कव्हर केलेले आहे. यातून हे दसून येते कि त्यांना स्वतःची स्पेस हवी आहे आणि ती सुद्धा आपल्या कुटुंबाबरोबर अपेक्षित आहे. अर्थात हि गोष्ट अतिशय बरोबर आहे. क्रिकेट खेळत असताना त्याने आपल्या कुटुंबाची आठवण काढली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाबाबत तो सुरक्षित करण्यास तत्पर आहे. त्यांच्याबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवण्याची त्याची इच्छा आहे. आता कोणत्याही वाद-विवादात पडण्याची त्याची इच्छा नाही. म्हणूनच त्यांनी स्वतःला सेफ करून घेतलं आहे कि कोणी त्याच्यापर्यंत पोचू नये म्हणून. शेवटचा जो आर आहे तो आधी जो पक्षासारखा होता तो लहान करून कर्सिव्ह मध्ये केला आहे. याचा अर्थ असं की, आधी भविष्याबाबतची जी आक्रमकता होती ती काही प्रमाणात कमी केली आहे. आयुष्यात स्थिरता अपेक्षित आहे. याहीपेक्षा मोठा बदल म्हणजे आधीच्या सही मध्ये आडवी रेघ होती त्याखाली डॉट होता त्याऐवजी ती लहान करून एक स्ट्रोक दिलेला आहे. याचाच अर्थ आता त्याला अजून काही करून दाखवायचे नाही, कोणावर ओझं व्हायचं नाही. पण तरीही आपले मत विचार मांडायचा आहे. परंतु ते इतरांनी ऐकाव याचा हट्ट नाही.

अशाप्रकारे सचिन तेंडूलकरला आता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, भविष्यात स्थिरता हवी आहे, कोणतेही आव्हान-जोखीम घ्यायची नाही आहे. कोणताही हट्ट आणि आक्रमकता नको आहे. कारण आयुष्याच्या या वळणावरती सचिनला शांततेने आयुष्य घालवण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्याची आत्ताची हि सही त्याला ती शांती मिळवून देत आहे.


स्वाक्षरी विश्लेषक
पंकज बाविस्कर : 9833274447

No comments:

Post a Comment

Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar

Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...