Tuesday, December 1, 2020

आपली स्वाक्षरी बदला आपलं जीवन बदलेल (भाग - २)

    आपण वेगवेगळ्या सिग्नेचरचे प्रकार पाहत आहोत. आधीच्या ब्लॉग मध्ये आपण मोठी सिग्नेचर, लहान सिग्नेचर, टोकदार सिग्नेचर असे काही प्रकार पाहिले आणि त्यानुसार स्वभाव कसा असतो याचे विवेचन केले. अशाच काही प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत. जेणे करून आपल्याला कळेल आपण नक्की आपली सिग्नेचर कशी करतो. बघू काही उदाहरणे...

    फ्लोविग सिग्नेचर म्हणजे एकदा सुरू केली की हात न उचलता पूर्ण सिग्नेचर केली जाते. ही लोक अंत्यत आशावादी असतात. कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी त्यावर मात करून आपलं मार्गक्रमण सुरू ठेवतात. लोकांशी परिचय करून घेणे, ओळख वाढवणे त्यांच्याशी नाते संबंध दृढ करार हे व्यक्तिमत्त्व असतं. पेहराव अंत्यत साधा असतो. वेगवेगळ्या पदार्थांचे ते शॉकीन नसतात. आहे त्या परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करणं त्यांना योग्य जमतं.

    प्रोजेक्ट एक्सझिकुशन, ट्रॅव्हरल, सेकेंड मॅनेजमेंट मध्ये असतील तर हातात घेतलेलं काम ते योग्य पध्दतीने पूर्ण करतात. या क्षेत्रात त्यांची प्रगती होते.

    आता जी सिग्नेचर तुम्ही बघत आहात ती आधीच्या सिग्नेचरच्या एकदम उलट आहे.

    प्रत्येक शब्दा नंतर फुल्लस्टोप दिला आहे तर संपूर्ण सिग्नेचर नंतरही फुल्लस्टोप दिलेला आहे. ही लोक इतरांशी थोडं लांबच राहणं पसंद करतात. मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी देखील थोडा दुरावा ठेवतात. हे एका वेळेला एकच काम करतात. एखाद काम तडीस घेऊन गेल्याशिवाय ते दुसर काम हातात घेत नाहीत. उत्तम ऑर्गनाईस असतात. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवायला आवडत असतं. खुप जास्त अंबिशियन्स नसतात. जे आहे त्यात समाधानी असतात. आणि सिग्नेचरच्या शेवटला फुल्लस्टोप देणारी व्यक्तीला सगळं समाधानकारक वाटत असते.

    ही सिग्नेचर म्हणजे आर्टिस्टिक सिग्नेचर एखादा साधा शब्द सुद्धा अत्यंत कल्पक पद्धतीने लिहताना दिसतात. त्यांचे स्ट्रोक एकदम भन्नाट असतात. सगळ्यांपेक्षा यांचा दृष्टीकोन वेगळाच असतो. परंतु हे खुप जास्त भावनिक असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे हर्ट होतात. एकदम मुडी स्वभाव असतो. कधी नाराज तर कधी आनंदी असतात. यांच्या स्वभावाचा पटकन अंदाज येत नसतो. वयक्तिक नाते संबंध मध्ये यांना समजून घेणं कठीण असतं यांना सांभाळावे लागते. परंतु ही मंडळी कला क्षेत्रात मात्र नाव कमावतात.

    काही ठराविक नमुने आपण पाहिले.

    तुम्ही कोणाचीही सिग्नेचर पाहीली की तुम्हांला अंदाज येऊ शकतो. पण फक्त आपल्याला सिग्नेचर कशी असावी आणि त्याचा स्वभावाशी ताळमेळ बसवणे एवढच उद्दिष्ट आहे का तर नक्कीच नाही. कदाचित यापूढे तुम्ही कोणाचीही सिग्नेचर पाहिल्यानंतर तुम्हाला साधारण समोरच्या व्यक्तीचा अंदाज येईल. आपल्याला यावरच थांबायचे आहे का? तर नक्कीच नाही आपला उद्दिष्ट हे आहे की, तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, आशा इच्छा, कठीण काळ, तुमच्या आयुष्यात तुम्हांला जे हवे त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःच्या स्वाक्षरी मध्ये योग्य तो बदल करून आपले ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करणे. तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही घडवून आणू शकता. फक्त आपल्या सबकॉन्शस माईंडला स्वाक्षरी द्वारे योग्य अशा सूचना, निर्देश पाहोचवणे गरजेचे आहे. चला एक पाऊल उचलूया आधी स्वतःची स्वाक्षरी समजून घेऊया आणि योग्यते बदल करू या...


स्वाक्षरी विश्लेषक
पंकज बाविस्कर : 9833274447

No comments:

Post a Comment

Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar

Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...